Narayan rane and Uddhav thackeray saam tv
मुंबई/पुणे

'पक्षात १ डझन आमदार आणि...'; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर नारायण राणे यांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. तसेच भाजपवर देखील निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.

नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले, 'ते आमदार शिवसैनिक होते. ते निवडून आले. सत्ता आणली. त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंशी जुळलं नाही. उद्धव ठाकरे पक्षपात करू लागले. त्यामुळे त्यांनी दुसरा गट तयार केला. शिवसेनेच्या नावावर बाहेर पडले आणि सरकारमध्ये गेले. स्वत:चं पद हे एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने उद्धव ठाकरे यांना पोटशूळ होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांना मुलाखत घ्यायला लावली'.

'तुम्हाला वर्षा निवासस्थानातून बाहेर पडल्यावर दु:ख का झालं. महाराष्ट्र प्रशासनाच्या कोणत्या योजना राज्याच्या जनतेसाठी वापरल्या ? शेतकरी, कामगार आणि उद्योजकासाठी काय परिवर्तन केलं ?. मंत्रालयात गेल्या अडीच वर्षात केवळ तीन तास मुख्यमंत्री आले. ठाकरे जे सांगत आहे तो खोटारडेपणा आहे. मुख्यमंत्रिपदावरून ठाकरे पायउतार झाल्यानंतर कोणाच्याही डोळ्यातून अश्रू आले नाही, असे राणे म्हणाले.

नारायण पुढे म्हणाले, 'आम्हाला इतिहास माहित आहे. आमच्यासाठी मातोश्री नवीन नाही. उद्धव ठाकरे या व्यक्तीला मी फार जवळून ओळखतो. शिवसेनेत मी ३९ वर्ष काढली. पक्षात आता १ डझन आमदार आणि पाव डझन खासदार राहिले आहेत. ठाकरे हिंदुत्व सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे लाचार झाले. आता सहानभुती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुलाखत घेतली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra News Live Update : मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक आज राहणार 3 तास बंद

ZP School : जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी गंभीर, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT