Borivali Police Station संजय गडदे
मुंबई/पुणे

Mumbai Crime: लॉकडाऊनमध्ये नोकरी गेलेल्या तरुणाची करामत; बनवाट सही करुन वृद्ध महिलेला ३ कोटी १४ लाखांचा गंडा

Borivali Crime News: बोरिवली पोलिसांनी आरोपीला दिल्ली येथून अटक केली असून सध्या आरोपीला पोलीस कोठडी मिळाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Borivali Crime News: लॉकडाऊनमुळे तरुणाची नोकरी गेली आणि त्याने झटपट पैसे कमावण्यासाठी नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. या तरुणाची पहिली शिकार बोरिवलीतील एक वृद्ध महिला ठरली.

या वृद्ध महिलेचे विविध कंपन्यांतील तब्बल तीन कोटींहून अधिकचे शेअर दुसऱ्या खात्यात वळवून फसवणूक करणाऱ्या दिल्लीच्या या ठगाला बोरिवली (Borivali) पोलिसांनी अटक केली. नरेश सिंग असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. नोकरी गेल्याने उदरनिर्वाहासाठी नरेशने हे कृत्य केल्याचे तपासात कबुल केले आहे. (Mumbai Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीत राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेने विविध 43 कंपनीचे शेअर ब्रोकिंग एजन्सीच्या माध्यमातून विकत घेतले होते. मात्र शेअरवरील कागदपत्रांमध्ये पत्ता व नावात बदल करण्यासाठी पत्रव्यवहार केला नसतानाही पत्र आल्याने महिलेला संशय आला आणि तिने ब्रोकिंग एजन्सीकडे संपर्क साधला. यानंतर अज्ञात ठगाने (Fraud) तक्रारदार यांचे डिमॅट खाते आणि राहण्याचा पत्ता बदलल्याचे समजले. यासाठी तक्रारदार महिलेची बनावट सही देखील केली असल्याचं समजलं. यातूनच 3 कोटी 14 लाख रुपयांच्या शेअर्सची परस्पर विक्री केल्याचे आढळून आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार महिलेने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात ठगाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बोरिवली पोलिसांनी आरोपीला दिल्ली येथून अटक केली असून सध्या आरोपीला पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा बोरीवली पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतील आश्चर्यकारक ५ बदल

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT