Mumbai; निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला, 13 जखमी Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai; निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला, 13 जखमी

मुंबई मधील बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उड्डाणपूल कोसळल्याची दुर्घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई मधील बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उड्डाणपूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. हा पूल निर्माणाधीन होता. उड्डाणपूलाचे काम सुरु असल्याने नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावर होते. मात्र, पहाटे ४ वाजेच्या सुमारास अचानक हा पूल पडायला सुरुवात झाली. हा अपघात झाला, तेव्हा पूलावर कमीत- कमी २० ते २५ मजूर काम करत होते. यावेळी या पूलाचा एक गर्डर खाली पडण्यास सुरुवात झाली.

हे देखील पहा-

पूल पडायला सुरुवात झाल्यावर काही मजूरांना त्याचा अंदाज आला. त्यामुळे या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला सुरवात केली. मात्र, १० ते १३ मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले आहेत. हे सर्वजण बाजूच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले आहेत. या मजूरांच्या दुखापत ही कितपत गंभीर आहे. हे अद्याप आजून देखील कळू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

त्यांनी बचावकार्य करण्यास सुरु केले आहे. त्यांनी जखमींना नाल्यातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात येत आहे. तरी कोणीही पूलाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती नाही. हा उड्डाणपूल कसा पडला, याचे कारणही अद्याप आजून देखील समजले नाही. मात्र, यावरुन आता परत एकदा मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलच राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

काही दिवसांअगोदर नवीन कोपरी पूल वापरण्याअगोदरच त्याला तडे लागल्याने वाद निर्माण झाला होता. पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीतून नागरिकांची, प्रवाशांची मुक्तता करण्याकरिता कोपरी येथे नवीन पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यापैकी २ लेनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु, यापैकी एका मार्गिकेवर तडे गेल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Maharashtra News Live Update: FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव टाका- संजय राऊत

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT