ulhasnagar woman jumps into jcb during demolition protest Saam tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Demolition: बेकायदा बांधकामाला विरोध, एका महिलेनं अंगावर रॉकेल ओतलं; दुसरी थेट जेसीबीत जाऊन बसली

Woman attempts self-immolation during MNC demolition: उल्हासनगर येथे काही दिवसांपासून बेकायदा बांधकामाविरोधात उल्हासनगर महापालिकेने हातोडा उचलला आहे.

Saam Tv

उल्हासनगर: येथील कॅम्प २ मधील हनुमान नगर परिसरात महापालिकेच्या भूखंडावर उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला. एका महिलेनं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर दुसरी थेट जेसीबीत जाऊन बसली. मात्र हा सगळा विरोध मोडून काढत पोलीस आणि महापालिकेच्या पथकाने आपली कारवाई पूर्ण केली.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, हनुमान नगर परिसरात अनधिकृतरीत्या पक्की घरं, जोते आणि पत्र्याची घरं बांधून जागा हडपण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू होता. याबाबत संबंधित अतिक्रमणधारकांना प्रभाग समितीने वेळोवेळी नोटीस बजावल्या होत्या. मात्र, स्वयंप्रेरणेने कोणीही जागा रिकामी केली नाही. अखेर सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आणि मनीष हिवरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली.

या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध केला. एका महिलेनं अंगावर रॉकेल ओतून घेतलं,मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तिला ताब्यात घेतलं. तर दुसऱ्या महिलेनं थेट जेसीबीत उडी घेत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. या सर्व विरोधानंतरही महापालिकेने आपली कारवाई पूर्ण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra News Live Update: आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

SCROLL FOR NEXT