ulhasnagar municipal corporation massive drive against dangerous buildings in city
ulhasnagar municipal corporation massive drive against dangerous buildings in city Saam Digital
मुंबई/पुणे

Ulhasnagar: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिका सतर्क, अतिधोकादायक 5 इमारतींवर फिरविला जेसीबी; 316 वास्तू धाेकादायक

अजय दुधाणे

उल्हासनगर शहरात 316 धोकादायक इमारतींची यादी महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. यामध्ये 5 इमारती अतिधोकादायक वर्गातील असून त्या पाडण्याचे काम उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रारंभ झाला आहे. तसेच 43 इमारती रिकाम्या करून त्यांची दुरुस्ती करण्याची गरज पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींची संख्या घटली आहे. गेल्या वर्षात 310 इमारती धोकादायक यादीत होत्या. शहरातील अति धोकादायक इमारतीत मिनर्वा पॅलेस अपार्टमेंट, रुपानी महल अपार्टमेंट, गंगासागर अपार्टमेंट, पवनधाम अपार्टमेंट या इमारतींवर उल्हासनगर महापालिकेकडून तोडक कारवाई केली जात आहे.

आगामी काळातील पावसाळा लक्षात घेता इमारत कोसळून लगतच्या नागरिकांना धोका होऊ नये यासाठी महापालिकेने अतिधाेकादायक इमारती निष्कासीत करण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील इतर भागात देखिल टप्या टप्प्याने धोकादायक इमारती निष्कासीत करण्यात येणार आहेत अशी माहिती महापालिकेतून देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni Quotes: 'माही' आवडे सर्वांना... पण का?

Muralidhar Mohol News: मुरलीधर मोहोळ यांच्याकडून नागरिकांना आवाहन!

Rakul Preet: डिझायनर लेहंगा अन् खास नेकलेस; ट्रेडिशनल रुपातली रकुल पाहिली का?

Jay Shah: जय शहांची पॉवर आणखी वाढणार! BCCI नंतर ICCचं मोठं पद मिळण्याची शक्यता

Husband Wife Relationship Tips : बायको रुसून माहेरी गेली? या टिप्सने स्वत: धावतपळत घरी येईल

SCROLL FOR NEXT