Crime samm tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar: वाट अडवली अन् डोक्यात राग गेला! भररस्त्यावर टोळक्यांकडून तरूणावर कोयत्याने सपासप वार

Group of People Attack Young Man with Swords and Knives: उल्हासनगरमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Bhagyashree Kamble

अजय दुधाणे, साम टीव्ही

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरूण जखमी झाला असून, त्याच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली असून, या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रोहित हिरे असे जखमीग्रस्त तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना उल्हासनगरच्या आशेळे गावातील भक्तीपीठ रस्त्यावर घडली आहे. त्या दिवशी रोहित आपल्या मार्गाने जात होता. या दरम्यान, तीन ते चार जणांच्या टोळीने त्याची वाट अडवली. तसेच कोयता, तलवार आणि चॉपरने हल्ला त्याच्यावर हल्ला केला.यात तरूण गंभीररित्या जखमी झाला. भररस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला.

पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर रोहित गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.

या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT