Mahesh Gaikwad Health Update  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : महेश गायकवाड यांच्या अडचणीत वाढ; हिललाईन पोलिसांत गुन्हा, काय आहे नेमकं प्रकरण?

Mahesh Gaikwad Latest News in Marathi : नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप महेश गायकवाड यांच्यावर आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद करण्यात आली आहे.

अजय दुधाने

Mahesh Gaikwad News :

कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप महेश गायकवाड यांच्यावर आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी, दमदाटीचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

जमीन विषयीच्या प्रकरणात महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात दोन महिन्यातील दुसरा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी दोन गुन्ह्यांमुळे महेश गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी महेश गायकवाड, यशवंत मुका फुलोरे, रोहिदास मुका फुलोरे, गणेश यशवंत फुलोरे, शेवंतीबाई मुका फुलोरे यांच्या नावाचाही समावेश आहे.

गेल्या महिन्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर महेश गायकवाड हे २५ दिवस ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत होते. दीर्घ काळ उपचार घेतल्यानंतर सुस्थितीत होऊन विकास कामे मार्गी लावण्यासाठी सक्रिय झाले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल भागात राहणारे बांधकाम व्यावसायिक सदृध्दीन बशर खान यांनी हा गुन्हा नोंद केला आहे. सदृध्दीन बशर खान यांची एफ एस ग्रुप ऑफ कंपनीज ही बांधकाम करणारी कंपनी आहे.

ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा खंडणी मागण्याचा प्रकार घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच प्रकरणी पोलिसांत गुन्हा करण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतर महेश गायकवाड यांच्यावर कारवाई केले जाते, हे पाहावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

SCROLL FOR NEXT