Ulhasnagar Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Fire: रिक्षाला लावलेल्या आगीत जीन्स कारखानाच जळाला, उल्हासनगरमधील घटना

Ulhasnagar Jeans Factory Burnt: उल्हासनगरच्या गायकवाड पाड्यात काही अज्ञातांनी रिक्षाला आग लावली. पण या आगीत जीन्स कारखानाही जळाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ulhasnagar Fire News

रिक्षाला लावलेल्या आगीत (Fire News) जीन्स कारखानाच जळाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. रिक्षा जाळण्याच्या हेतुने ही आग लावण्यात आली होती. पण या आगीत जीन्स कारखान्याचं नुकसान झालं आहे.

उल्हासनगरच्या (Ulhasnagar) गायकवाड पाडा परिसरात अज्ञात समाजकंटकांनी रिक्षाला मध्यरात्री आग लावली, आणि ते पळून गेले. ही आग अतिशय भीषण होती. या आगीत संपूर्ण रिक्षाची जळून राख रांगोळी झाली आहे.

जीन्स कारखान्याला आग

धुराचे मोठे लोट निघत होते. ही आग (Fire) खूपच जास्त होती. तिच्या झळा जवळ असलेल्या जीन्स कारखान्यापर्यंत पोहोचल्या होत्या.

नाही तर बाजूला असलेल्या जीन्स कारखान्याला देखील आग लागली (Ulhasnagar Fire News) होती. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. हनुमान मंदिर रस्त्यालगत शंकर धोत्रे हे नेहमीप्रमाणे रिक्षावर भाडेकरू सोडून रिक्षा पार्किंग करतात. रात्रीही त्यांनी तशीच रिक्षा पार्क केली होती. परंतु आज काही अज्ञात समाजकंटकांनी रिक्षाला आग लावून पेटवून दिली.

जीन्स कारखाना आणि रिक्षा जळाली

ही आग भीषण होती की, बाजूला असलेल्या जीन्स कारखान्याला (Jeans Factory Burnt) देखील झळा पोहचल्यात. यात जीन्स कारखाना आणि रिक्षा जळाली आहे.

दरम्यान ही आग कोणी लावली, का लावण्यात आली याचा तपास अधिक शिवाजीनगर पोलीस करत आहेत. यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं (Ulhasnagar Jeans Factory) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT