Ulhasnagar Crime: अनैतिक संबंध ठेवायचे नसतील तर ५ लाख दे! महिलेवर कोयत्याने हल्ला Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime: अनैतिक संबंध ठेवायचे नसतील तर ५ लाख दे! महिलेवर कोयत्याने हल्ला

पैसे न दिल्याने हल्ला केल्याचे आले समोर

अजय दुधाणे

मुंबई: अनैतिक संबंध ठेवायचे नसतील, तर ५ लाख दे अशी मागणी करत एका इसमाने महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात (Ulhasnagar) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) हत्येच्या (killing) प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत हल्लेखोराला बेड्या ठोकले आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मध्ये राहणारी एक महिला हार फुलांचा स्टॉल (Flower stall) चालवते. या महिलेच्या पतीचे निधन झाले असून तिच्याच स्टॉलवर काम करणाऱ्या रघुनाथ कृष्णा भोईर याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध होते. हे दोघेही अनेक वर्ष एकत्रच राहत होते.

हे देखील पहा-

मात्र, आता या महिलेची मुलं मोठी झाल्याने मुलांना ही बाब आवडत नव्हती. त्यामुळे या महिलेने रघुनाथ याला आपल्याला आता एकत्र राहता येणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यावर तुला जर माझ्याशी असलेले संबंध तोडायचे असतील, तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी रघुनाथ भोईर याने या महिलेकडे करत असत. त्यावर महिलेने पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्याने रघुनाथ याने महिलेची हत्या करण्याचा डाव आखला आहे. २८ फेब्रुवारी दिवशी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास ही महिला स्टॉलवर एकटीच असताना रघुनाथ हा तिथे आला आणि त्यानं कोयत्याने तिच्या मानेवर आणि कमरेवर हल्ला केला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला आधी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात (hospital), तिथून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि तिथून सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. या महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपी रघुनाथ कृष्णा भोईर याला बेड्या ठोकले आहेत. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: साखर विक्रेते आणि पुरवठादारांनी 15 दिवस पुरेल इतकाच साठा करावा- जिल्हा पुरवठा अधिकारी

Sugar Vs Rocksugar: साखर आणि खडीसाखर, चहासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT