Ulhasnagar News Saam TV
मुंबई/पुणे

Ulhasnagar News: मुलाला शाळेत सोडून घरी निघाली आई; अचानक दुचाकीस्वार आले अन् घात झाला, पाहा धक्कादायक VIDEO

Crime News: दोन तरुण दुचाकीवरून एका महिलेच्या दिशेने आले आणि गळ्यातील सोन्याची चैन चोरून फररा झाले.

साम टिव्ही ब्युरो

Ulhasnagar:

उल्हासनगरमध्ये चोरांचा सुळसूळाट सुटला आहे. अनेक जण सर्रासपणे रस्त्यावर चोरी करतात. काल सकाळी देखील शहरात चोरीची एक घटना घडली. दोन तरुण दुचाकीवरून एका महिलेच्या दिशेने आले आणि गळ्यातील सोन्याची चैन चोरून फररा झाले. पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, महिला आपल्या मुलाला शाळेत सोडून पुन्हा घरच्या दिशेने निघाली होती. घरी जात असताना २ जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जोरात खेचली. आपल्यासोबत अशी चोरी होईल अशी कोणतीही कल्पना या महिलेच्या मनात नव्हती. अचानक असे घडल्याने ती गोंधळून गेली. काय करावे काय करूनये काहीच महिलेला समजत नव्हते.

चोरीची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उल्हासनगरमध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. उल्हासनगर,अंबरनाथ शहरात सातत्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनकडून होत आहे.

जुन्या भांडणाच्या रागातून हत्येचा प्रयत्न

उल्हासगरमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच किरकोळ वादातून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली होती. कॅम्प चारमधील मराठा सेक्शन परिसरात राहणारा मृगण हा इडली विक्री व्यवसायाचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

आपल्या दुकानावर काम करताना सात ते आठ जणांच्या टोळीने तलवार आणि रॉडच्या साह्याने तरुणावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात मृगण गंभीर जखमी झालता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT