Ulhasnagar Crime News
Ulhasnagar Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमधून 3 लाख 90 हजारांचे अमली पदार्थ जप्त; 4 जणांना अटक

Ruchika Jadhav

अजय दुधाणे, उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये अमली पदार्थांप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीत रेल्वे स्टेशनजवळ गुलजार टॉवर परिसरातून सहा किलो गांजा आणि 10 ग्राम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलंय.

उल्हासगनमध्ये अनेक तरुण अमली पदार्थ्यांच्या विळख्यात सापडल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणावरून काही दिवसांपूर्वी 30 ते 40 अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली.

वरिष्ठांच्या आदेशानुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. मध्यवर्ती पोलिसांच्या गुन्हे शाखेने हद्दीतील अमली पदार्थ विक्रेते शोधण्यास सुरूवात केली आहे.

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आकाश पंजवानी, रोहित गुप्ता, समीर खत्री आणि सोमनाथ सोनावणे यांना अटक केलीये. तेसच त्यांच्याकडून तीन लाख 90 हजार रुपयांचा सहा किलोचा गांजा आणि 10 ग्राम एमडीड्रग्स जप्त केला आहे.

नागपूर विमानतळावर 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक

याच महिन्यात नागपूरमध्ये देखील अशीच घटना उघडकीस आली होती. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे 8 कोटी 81 लाख रुपयांचे 2 किलो 937 ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले होते. तसेच याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Australia Squad: T-20 WC आधी ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल! १५ चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजाला संघात स्थान

FD Investment Tips: एक नंबर! तुमच्या गुंतवणुकीवर 'या ५ बँका देतील ९.६० टक्के व्याज

Satara Peacock Viral : माणसाळलेला मोर बघा! बिनधास्त पिसारा फुलवून पर्यटकांच्या घोळक्यात नाचतोय, मोबाइल कॅमेऱ्यासमोरही देतो पोझ, Video

Jos Buttler,ENG vs PAK: टी-२० वर्ल्डकपआधी इंग्लंडला मोठा धक्का! महत्वाच्या मालिकेतून जोस बटलर बाहेर

Sambhajinagar HSC Topper | पोरी जिंकलंस, संभाजीनगरच्या तनिषाने बारावीत मिळवले 100 टक्के गुण

SCROLL FOR NEXT