Ulhasnagar Crime News,  saam tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime: भाजप पदाधिकारी नरेश रोहरा गोळीबार प्रकरण; हिललाईन पोलिसांकडून ४ आरोपींना अटक

Firing On Naresh Rohra Office Case Update: उल्हासनगरमधील भाजपाचे पदाधिकारी नरेश रोहरा यांच्यावर कार्यालयाजवळ गोळीबार करण्यात आला होता.

अजय दुधाणे

Ulhasnagar Firing News Update: काही दिवसांपूर्वी उल्हासनगर मधील भाजपाचे पदाधिकारी नरेश रोहरा यांच्यावर कार्यालयाजवळ गोळीबार करण्यात आला होता. हिललाईन पोलिस हद्दीत झालेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या गोळीबार प्रकरणात आता महत्वाची अपडेट समोर आली असून या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, उल्हासनगरात (Ulhasnagar) भाजपाच्या पदाधिकारी नरेश रोहरांच्या कार्यालयावर गोळीबार केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात उल्हासनगर हिल लाईन पोलिसांना यश आले आहे. १० जुलै रोजी उल्हासनगर कॅम्प नं. ५ मधील प्रभाराम मंदिराजवळ भाजप पदाधिकारी नरेश रोहरायांच्या कार्यालयावर चार जणांनी गोळीबार केला होता.

तसेच त्यांनी रोहरा यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणात तपास करत उल्हासनगर क्राईम (Ulhasnagar Crime Branch) ब्रांचने एका विधी विधीसंघर्षित आरोपीला याला ताब्यात घेऊन अटक करून दोन दिवसांपूर्वी हिल लाईन पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

आज हिल लाईन पोलिसांनी गुजरात येथून उर्वरित तीन आरोपींना अटक केली आहे. दिलावर चव्हाण, मनोज गुप्ता, गणेश मेरुकर, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी दिली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकी सैन्यातील अधिकाऱ्याने रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट, कोणी वाचवला जीव? धक्कादायक अहवाल समोर

Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्रातला तो खासदार कोण? अंबादास दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Satish Shah Love Story: दोन वेळा नकार नंतर थेट लग्न; चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही अभिनेते सतीश शाह यांची लव्हस्टोरी

Avneet Kaur Photos: अवनीत कौरच्या हॉट अदा, फोटोंवरून नजर हटणार नाही

SCROLL FOR NEXT