अजय दुधाणे
मुंबई/पुणे

उल्हासनगर: अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा रचला कट रचून पुजाऱ्याने केले स्वतःवर वार !

मंदिरातील पुजाऱ्याने स्वतःच्या हत्येचा बनाव करत स्वतःवरच हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) घडली आहे.

अजय दुधाणे

अजय दुधाणे

उल्हासनगर: मंदिरातील पुजाऱ्याने स्वतःच्या हत्येचा बनाव करत स्वतःवरच हल्ला केल्याची घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) घडली आहे. याबद्दल माहितीनुसार, हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅम्प नंबर ५ विठ्ठलनगर परिसरात वरून दिलीप लुल्ला याचे गणपतीचे मंदिर असून तो त्याठिकाणी पुजारी आहे.

शुक्रवारी रात्री वरून वर दोन अज्ञात हल्लेखोरांनी ब्लेडने वार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तात्काळ त्यांना उपचारासाठी क्रीटीकेअर रुग्णालयात हलविण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत वरुणच्या तक्रारी वरून गुन्हा ही दाखल केला. (Ulhasnagar Crime News)

या गुन्हयात वरूनचा मित्र संदीप कसबे हा साक्षीदार ठरला. कारण वरून वर झालेले वार हे पोलिसांना संशयास्पद वाटत होते. पोलिसांनी साक्षीदार संदीप याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वतःने वार केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी वरूनला चौकशीसाठी आज पोलीस ठाण्यात आणले आणि त्याची अधिक चौकशी केली.

हे देखील पहा-

चौकशीदरम्यान, त्याने स्वतःहून वार केल्याचे कबूल केले. काही दिवसांपासून वरूनच्या घरात कौटुंबिक वाद निर्माण झाले आहेत आणि तो अक्षरशः कंटाळून गेला असल्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र हल्लाचा बनाव रचण्याचा कारण अजूनही अस्पष्ट असून , आता प्रकरणी हिललाईन पोलिसांनी वरून लुल्ला याला अटक केली. त्याच्या विरोधात विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरूनला उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका, 'ही' ५ लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरकडे पळा

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

CET मध्ये कमी गुण मिळाल्याने पुण्यातील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Fan Speed Increase Tips: पंखा संथ गतीने फिरतोय? 'या' 5 सोप्या ट्रिक्समुळे झटक्यात वाढेल स्पीड, येईल थंड हवा

Weight Loss Pizza Recipe : ना मैदा ना जड ब्रेड; 'असा' बनवा चटपटीत अन् हेल्दी पिझ्झा, डाएट बिघडणार नाही

SCROLL FOR NEXT