shivajirao adhalrao patil Saam Tv
मुंबई/पुणे

शिवाजीराव आढळराव पाटील यांना 'मातोश्री'वर येण्याचा उद्धव ठाकरेंचा निरोप

मातोश्रीवरुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भेटीसाठी आमत्रणं आल्याची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेतील अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर कोणता आमदार आणि मंत्री बंडखोर होईल हे सांगता येत नव्हत. अशा परिस्थितीमध्येच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी देण्यात आली होती. दरम्यान, काही तासांमध्येच शिवसेनेकडून शिवसेनेकडून (Shivsena) आढळराव पाटील हे शिवसेनेतच कार्यरत राहणार असून त्यांची हकालपट्टी केलं नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.

अशातच आता राज्यात झालेल्या सत्ताबदल, शिवसेनेला लागलेली गळती या सर्व पार्श्वभूमिवर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता ठाकरेंनी पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ते अनेक शाखांना भेट देत तेथिल कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

दरम्यान, आता मातोश्रीवरुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भेटीसाठी आमत्रणं आल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांनी हा निरोप पाठवल्याचं सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची बातमी छापून आल्यामुळे मला धक्का बसला होता. आपल्यावर ही कारवाई का करण्यात आली हे माहित नसल्याचं पाटील म्हणाले. कारवाई मागे घेण्यात आली असली तर आता पुन्हा नव्याने सुसंवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाटील यांना निरोप दिला असावा असंही सांगण्यात येत आहे.

त्यामुळे केलेली कारवाई -

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत. 'गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असंही कॅप्शन लिहिले होतं. तसंच या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकलेला नव्हता. या दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी सामना मध्ये देण्यात आली होती. मात्र, नंतर कारवाई मागे घेण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT