Devendra Fadanavis and eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

'सुप्रीम' सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष; सर्वोच्च न्यायालयात आज ठरणार शिंदे सरकारचं भवितव्य

सुप्रीम कोर्टात आज तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी होणार आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता शिवसेनेत दोन गट पडले असून खरी शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी व्हिप मोडला असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेने यासंदर्भात सुप्रीम कोर्टात तीन याचिका दाखल केल्या आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. (Eknath Shinde News)

एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी व्हीप मोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी अशी याचिका शिवसेनेकडून न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

महत्वाचं म्हणजे या खंडपीठाच्या निर्णयावरच सध्याच्या सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने या सुनावणीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागलं आहे. शिवसेनेने सुप्रीम कोर्टात नव्या सरकारविरोधात तीन याचिका दाखल केल्या आहेत. राज्यपालांनी शिंदे गटाला सत्ता स्थापन करण्याची दिलेली परवानगी, आमदारांनी मोडलेला व्हीप, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या याचिकांवर सुनावणीसाठी तीन सदस्यीय खंडपीठ नियुक्त करून यासंदर्भातील याचिकांची सुनावणी घेण्यास सांगितले होते. त्यानुसार या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हीमा कोहली यांचा समावेश आहे. आज या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. त्यामुळे खंडपीठ काय निर्णय देते? आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटावरची लटकलेली चरबी सांगेल शरीरातली 'ही' कमजोरी

Maharashtra News Live Update: माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मोठी बातमी! छगन भुजबळ दिल्लीला जाणार? फडणवीस सरकारमध्ये 'या' नेत्याला मिळणार संधी? महत्त्वाची अपडेट समोर

Heart health warning signs: फक्त छातीत दुखणं नाही तर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

Shocking : 'बाईSSS हा काय प्रकार!' स्पा करायला महिलेने डोळे बंद केले, सलून मालकाची नियत फिरली अन्...

SCROLL FOR NEXT