Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Thackeray Vs Shinde: ठाकरे गटातील शिवसैनिकांना जामीन तर शिंदे गटातील आमदारावर गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे काही पदाधिकारी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला आले असता त्यांच्यावरती गुन्हे दाखल केल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला होता.

सुरज सावंत

मुंबई: गणपती विसर्जनावरून काल रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास मुंबईच्या प्रभादेवी येथे शिंदे गट आणि ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. शिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक (Shivsainik) भिडल्याची माहिती समोर आली आहे.

काल रात्री झालेल्या राड्या प्रकरणी ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे काही पदाधिकारी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला आले असता त्यांच्यावरती गुन्हे दाखल केल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. शिवाय आमदार सरवणकर यांच्या विरोधात जोपर्यंत तक्रार दाखल करून घेत नाहीत तोपर्यंत दादर पोलिस स्टेशन (Dadar Police Station) बाहेरून हटणार नसल्याचा त्यांनी इशारा दिला होता.

पाहा व्हिडीओ -

त्यानंतर आता दादर पोलिस स्टेशनमधील पोलिसांनी ठाकरे गटातील ज्या पाच शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यांना जामीन मंजूर केला असून त्यांची आता पोलिस स्टेशनमधून सुटका केली आहे.

शिवाय या शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घेतला असून त्यांना थोड्याच वेळात त्यांना पोलिस सोडणार असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली होती. एकीकडे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाले आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांच्यासह समाधान सरवणकर आणि संतोष तेलवणे यांच्यावर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Constipation Problems: पोट साफ न होण्यामागे ही आहेत ५ धोकादायक कारणं; वेळीच व्हा सावध अन्यथा...

हायहोल्टेज ड्रामा! अखेर संख्याबळाचा घोळ सुटला, थलपतीचाच 'विजय'; आज शपथविधी

Maharashtra News Live Update: कांद्याचा भाव एक रुपया कीलो, संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्याने 600 गोण्या कांदा दिला पेटवून

अडचणीत मित्र साथ देतील, महालक्ष्मींची कृपा राहील; ५ राशींच्या लोकांना अफाट धनसंपत्ती अन् प्रेम मिळणार

मराठीत 94 हजार विद्यार्थी नापास, मातृभाषेतच 8 टक्के मुलांची दांडी गुल

SCROLL FOR NEXT