Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; फॉरमॅट चुकल्याने अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी

निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने 11 लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे शिवसैनिकांकडून जमा केली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाने 11 लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे शिवसैनिकांकडून जमा करत आघाडी घेतली आहे. मात्र, ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाने आयोगाला पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याने निरुपयोगी ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी ठरली असली तरी देखील 8.5 लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा करण्यात ठाकरे गटाला यश आलं आहे. खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे.

पाहा व्हिडीओ -

शिवाय आपली शिवसेना हीच खरी सेना असल्याचं सिद्ध करण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांमार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत. ही प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात ठाकरे गटाने आघाडी घेतली असली तरी ती निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये ही प्रतिज्ञापत्र नसल्याने तब्बल अडीच लाख अर्ज निरुपयोगी ठरल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही कागदपत्र आता जमा करुन देखील निरोपयोगी ठरल्याने ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Horoscope : 'विठूमाऊलीची' अथांग कृपा! आज ६ राशींचे नशीब उजळणार; होणार धनलाभ, तुमच्या भाग्यात आज काय?

मुंबईतील डेअरिंगबाज तरुण आंदोलक, बेधडक GEN Z ; आंदोलनात डिजिटल पिढीचा स्वॅग

पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावलं; विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्ज ठेवण्याची धमकी

Friday Horoscope: या राशींना आरोग्याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; वाचा आजचं राशीभविष्य

Sonam Wangchuk Ends Hunger Strike: सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांनंतर उपोषण मागे, सरकारकडून काय आश्वासन मिळालं?

SCROLL FOR NEXT