Uddhav Thackeray's political move before Operation Tiger 3.0 Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगर 3.0 आधी उद्धव ठाकरेंची खेळी; शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश,शिंदे गटाला जोरदार धक्का

Maharashtra Politics : ऑपरेशन टायगर 3.0 ची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी राजकीय खेळी केली आहे. शिंदे गटातील शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याचा दावा करण्यात येत आहे.

Bharat Jadhav

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा ऑपरेशन टायगर मोहीम राबवणार असल्याची चर्चा

  • उद्धव ठाकरेंनी राजकीय डाव टाकल्याचं वृत्त आहे.

  • शिंदे गटातील शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर मोहीम राबवतील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र शिंदेंच्या ऑपरेशन टायगर ३.० आधीच उद्धव ठाकरेंनी मोठा डाव टाकत शिंदे गटाला जोरदार धक्का दिलाय. शिंदे सेनेच्या शिवसेनेला धक्का देत ठाकरेंनी शिंदे गटातील शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतलंय.

शिवसेना शिंदे गटाच्या डोंबिवलीमधील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीमध्ये या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेलं एक पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. दरम्यान हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा ऑपेरेशन टायगरच्या चर्चेला उधाण आलं होतं. व्हायरल पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांच्या फोटोसोबतच वेट अँड वॉच 3.0 असा मजकूर देखील लिहिण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं आखली रणनीती; सतेज पाटलांवर सोपवली मोठी जबाबदारी

Weather Update:145 किमीच्या वेगानं येतंय चक्रीवादळ; सोसाट्याच्या वाऱ्यासह 13 राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस

CJPची लवकरच राजकारणात एण्ट्री? CJPच्या पक्षसंघटना बांधणीसाठी हालचाली

Tuesday Horoscope: आज या 3 राशींचे नशीब चमकणार! कोणाला मिळणार यश, तर कोणाला पैशांचा लाभ?

पवारांच्या राष्ट्रवादीत डिलिमिटेशनवरून मतभेद? आमच्यासाठी आई-वडिलांचा शब्द अंतिम' सुप्रिया सुळेंचा आव्हाडांना टोला

SCROLL FOR NEXT