Uddhav Thackeray  
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : ठाकरे मविआतून बाहेर पडणार? मोतोश्रीच्या बैठकीत खलबतं, स्वबळाचा सूर

Uddhav Thackeray Shiv Sena Likely Exit MVA Maharashtra : विधानसभेतील खराब कामगिरीनंतर ठाकरे मविआतून बाहेर पडणार का? याची राजकीय चर्चा सुरु असतानाच मातोश्रीवरील बैठकीत नेत्यांनी स्वबळाचा नारा दिलाय.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray Likely Exit MVA Maharashtra : विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून तयारी करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर झालेल्या बैठकीत अनेक नेत्यांनी मविआमधून बाहेर पडण्याबाबत मते व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंकडून याबाबत विचार सुरु असल्याचे समजतेय.

विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात गळती वाढण्याची शक्यता जास्त आहे. सत्ताधाऱ्यांच्या प्रखर हिंदुत्ववादाचा मुद्दा खोडून काढण्यासाठी ठाकरेंकडून स्वबळाची तयारी सुरु करण्यात आल्याचे वृत्त आहे. मंगळवारी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्याची बैठक पार पडली, त्यामध्ये नेत्यांचा स्वबळाचा सूर होता, अशी माहिती मिळाली. त्याशिवाय अंबादास दानवे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे मनपा निवडणुकीआधी ठाकरे मविआतून बाहेर पडतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

२८८ विधानसभा मतदार संघात पक्षाने मजबूत व्हावा अनेकांचं मत होतं. मातोश्रीवर झालेल्या कालच्या बैठकीत उद्धव ठाकरेंसमोर अनेकांनी आपले मत व्यक्त केले. त्यामुळे उद्धव ठाकरे आता नेमकी काय भुमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. आगामी स्थानिक संस्थाच्या निवडणुकीत ठाकरे गटाची महत्वाची भूमिका ठरणार आहे.

मविआतून बाहेर पडणार का? दानवेंच्या वक्तव्याने चर्चा

प्रसारमाध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी स्वबळाचे संकेत दिलेत. ते म्हणाले की, स्वबाळाचा नारा नाही पण काहींनी भूमिका मांडल्या. म्हणजे लगेच निर्णय होत नसतो. पण सर्व मतदारसंघात संघटना मजबूत व्हावी असं मत सगळ्यांनी मांडलं. भूमिका मांडत असतात. मी भूमिका मांडली म्हणजे पक्ष लगेच निर्णय घेत नाही. भूमिका मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे, सर्वांचं मत जाणून घेतलं जाईल, असे दानवे म्हणाले. निवडणूका कोणासोबत लढातचं हे पक्षप्रमूख ठरवतील. मागे आम्ही लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. एखाद्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वेगळा निर्णय होउ शकतो ते पक्षप्रमूख ठरवतील, असेही दानवे म्हणाले.

मुंबईत महापौर भाजपचा असेल -

ठाकरेंच्या बैठकीत स्वबळाची चर्चा झाली, त्याबाबात बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत भाजपचाच महापौर असेल, असे म्हणाले. मुंबई ते जिंकत नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावे. 2017 साली आमचा महापौर बसला असता पण आम्हाला त्यावेळी वातावरण खराब करायचं नव्हतं, म्हणून आम्ही काही केलं नाही. पण आता मात्र मुंबईत महापौर भाजपचा असेल, असे मुनगंटीवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT