संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Operation Tiger-4 : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी 'ऑपरेशन टायगर-४' बाबत उघडपणे वक्तव्य केले आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे १४ आमदार आणि अनेक नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
मुरजी पटेल यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच ६ खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली होती. त्यानंतर आता आमदार आणि नगरसेवकही शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समोर येत आहे.
महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने अंधेरी पूर्व परिसरात आमदार मुरजी पटेल यांच्या वतीने 'आवाज शिवसेनेचा, जल्लोष स्त्री शक्तीचा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांच्या ग्रुप डान्स, पाककला आणि मंगळागौरीच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. यामध्ये शेकडो महिलांनी उत्साहाने सहभागी होऊन आपल्या कला सादर केल्या, तर विजेत्या महिलांना मोठ्या प्रमाणावर पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार मुरजी पटेल यांनी एक मोठा दावा केला. ते म्हणाले, "येत्या काही दिवसांत राज्यात 'ऑपरेशन टायगर-४' पाहायला मिळेल. शिवसेना ठाकरे गटाचे १४ आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करतील. एवढेच नाही तर ठाकरे गटाचे अनेक नगरसेवकही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. आधी आमदारांचा आणि त्यानंतर नगरसेवकांचाही शिंदे गटात अधिकृत पक्षप्रवेश होईल."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.