Ayodhya Ram Mandir Shivsena VIDEO Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Ayodhya Video: उद्धव ठाकरे नाशकात, पण अयोध्येत घुमला शिवसैनिकांचा आवाज; VIDEO होतोय व्हायरल

Ram Mandir Shivsena VIDEO: उद्धव ठाकरे नाशिकात असताना दुसरीकडे अयोध्येत ठाकरे गटाचा आवाज घुमला. मुंबईतून अनेक शिवसैनिक सोमवारी (२२ जानेवारी) अयोध्येत दाखल झाले होते.

Satish Daud

Ayodhya Ram Mandir Shivsena VIDEO

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला देशभरातील राजकीय नेते, व्हीआयपी तसेच बॉलिवूडमधून कलाकार मंडळींची उपस्थिती होती. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी अयोध्येला जाणं टाळलं. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपने केलेला हा राजकीय कार्यक्रम असल्याची टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इतकंच नाही, तर भाजपची राजकीय स्टंटबाजी संपल्यानंतर आम्ही अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊ, असंही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जाहीर केलं. अयोध्येत लोकार्पण सोहळा होत असताना त्यांनी नाशिकमध्ये जाऊन काळाराम मंदिरात दर्शन घेतलं.

यावेळी त्यांनी गोदावरी नदीची आरती देखील केली. दरम्यान, एकीकडे उद्धव ठाकरे नाशिकात असताना दुसरीकडे अयोध्येत ठाकरे गटाचा आवाज घुमला. मुंबईतून अनेक शिवसैनिक (Shivsena) सोमवारी (२२ जानेवारी) अयोध्येत दाखल झाले होते. राम मंदिर परिसरात जाताच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने घोषणा दिल्या. (Latest Marathi News)

आम्ही मुंबईतून अयोध्येत प्रभू रामचंद्राचं दर्शन करण्यासाठी आलो असून येथे राम मंदिर बांधण्यात यावं, ही बाळासाहेबांची इच्छा होती. अयोध्येतील लढ्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं योगदान होतं, असं म्हणत शिवसैनिकांनी परिसरात बाळासाहेब ठाकरेंच्या नावांच्या घोषणा दिल्या.

इतकचं नाही, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या देखील नावाची घोषणाबाजी केली. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा अयोध्येतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

'ऑपरेशन लोटस'ला तडा, या माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशाला विरोध, भाजप कार्यकर्तांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT