Mumbai News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून 'ठाकरे' सरकारच्या कोरोना काळातील कामाचं कौतुक, ED कारवाईवरुन टीका करणाऱ्या भाजपची पंचाईत

Political News : ठाकरे गटाने कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचे आरोप भाजपकडून केले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या कामात गैरव्यवहाराबाबत ईडीने विविध ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीनंतर भाजपने ठाकरे गटावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचे आरोप भाजपकडून केले जात आहे.

कोरोना काळात झालेल्या कामासंदर्भात एकीकडे तत्कालीन सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया कोरोना काळात राज्यात चांगलं काम झाल्याचं सांगत कोरोना काळातील कामाचे कौतुक केलं आहे. (Latest Marathi News)

मात्र, त्यावेळी उद्धव ठाकरे  सरकार असल्याचा प्रश्न उपस्थित करताच. कोरोना काळातील कामावर कुठल्याही प्रकारे राजकारण मला करायचं नाही. मात्र जर यामध्ये कुठलं चुकीचं काम झालं असेल तर या संदर्भात कारवाई व्हायला हवी असं सुद्धा मनसुख मांडविया यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. (Political News)

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बोलताना मनसुख मांडवीया हे आयुष्यमान भारत योजनेत संदर्भात बोलत असल्याचं सांगत सारवासारव केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

Gadchiroli Flood: गडचिरोलीत पावसाचा कहर; २५ प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT