Sushama andhare  Saam tv
मुंबई/पुणे

Dasara Melava 2023: दसरा मेळाव्यात सुषमा अंधारेंची तोफ धडाडली; भाजप आणि प्रमुख नेत्यांवर डागलं टीकास्त्र

'देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नेत्यांची राजकीय कारकिर्द संपवली, आता चंद्रकांत पाटील यांच्या मागे लागले आहेत, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Vishal Gangurde

Dasara Melava 2023: शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवर सुरु असलेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्याला हजारो शिवसैनिक जमा झाले आहेत. या मेळाव्याच्या सभेत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.

'देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नेत्यांची राजकीय कारकिर्द संपवली, आता चंद्रकांत पाटील यांच्या मागे लागले आहेत, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात भाजप आणि इकर प्रमुख नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. सुषमा अंधारे म्हणाल्या, 'गेल्या दीड महिन्यांपासून भूमिका मांडतेय की, महाराष्ट्र नशामुक्त झाला पाहिजे. आपलं राज्य उडता पंजाब होऊ नये. नाशिकमध्ये शेकडो कोटींचा ड्रग्ज सापडतो. मग नाशिकचे पालकमंत्री सोंगट्या खेळत होते का? नोटिसा पाठवणारे आतून माझ्याशी सेटिंग करायला बघताहेत'.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

'ललितला ९ महिने रुग्णालयात ठेवले. त्या ललितला कुठल्या आजारपणासाठी ठेवले होते. मला घाबरवण्यासाठी फडणवीस लोकांना पाठवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला घडवलं नाही, फक्त जमवलं. त्यांनी नेते संपवले आहेत. आता चंद्रकांत पाटील यांच्या मागे लागले आहेत, असे अंधारे म्हणाल्या.

'भाजप एवढा मोठा पक्ष असताना आमच्या पक्षातील माल कशाला उचलता. फडणवीस, तुम्ही अनेकांना नडला असाल, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेशी गाठ पडली नसेल, असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT