Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Nagpur MLC Election : भाजपच्या पराभवानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, वंचितची साथ लाभली तर..,

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

Satish Daud

Nagpur MLC Election : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार नागोराव गाणार यांचा दारुण पराभव केला. दरम्यान, भाजपच्या या पराभवानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  (Maharashtra Political News)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नागपुरात महाविकास आघाडीचा विजय आणि भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजप नेत्यांना चांगलचं डिवचलं आहे. (Latest Marathi News)

राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांच्या सारख्या नेत्यांची राजकीय प्रस्थ असलेला हा मतदारसंघ आहे. यामध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवून भाजप आणि मिंथे गटाचा पराभव केला आहे, असं विनायक राऊत म्हणाले.

नागपुरात झालेला हा पराभव देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बानवकुळे यांचा आहे, असंही ते म्हणाले. नागपूरमधील सर्व मतदारांनी दाखवून दिलेलं आहे, की सध्याच्या मिंधे सरकारपेक्षा महाविकास आघाडीवर त्यांचे प्रेम आहे. ते प्रेम या निवडणुकीतून दिसून आलं आहे”, असंही विनायक राऊत म्हणाले.

दरम्यान, शिवसेना वंचित युतीबाबत बोलताना विनायक राऊत म्हणाले, महाविकास आघाडी ही मूळ आघाडी आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत युती करताना अजित पवार यांनी आपली पसंती कळवली होती. महाविकास आघाडीचा वंचितची साथ मिळाली तर गद्दार गटाला धक्का देणारं वातावरण तयार होईल.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT