Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

"आपण डब्बा, उद्धव ठाकरे इंजिन; आम्ही इंजिनच्या मागे चालणारे कार्यकर्ते"

'राज ठाकरेंना मी लहानपणापासून ओळखतो. हाफ चड्डीपासून मी शिवसैनिक आहे तेव्हापासून...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी -

पुणे : आपण तर डब्बा आहे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आमचं इंजिन आहे. आम्ही इंजिनच्या मागे चालणारे कार्यकर्ते आहोत. जे निर्णय ते घेतात त्याची अंमलबजावणी आम्ही करत असतो.' असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील ठरावावरती बोलताना केलं आहे.

ते आज पुण्यात (Pune) जलजीवन मिशन आढावा बैठकीसाठी आले असता बोलत होते. ते म्हणाले प्रत्येक गावाला पाणी मिळावं यासाठी ही योजना राबवली जातीये 27 हजार गावात पाणी द्यायचं आहे. टँकरची पाणी मागच्या काळापेक्षा कमी आहे.

हे देखील पहा -

यावेळी त्यांनी पत्रकारांनी शरद पवरांच्या (Sharad Pawar) दिल्लीतील बैठकीत युपीएच्या नेतृत्वाबाबत केलेल्या ठरावावर प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले, 'महाविकास आघाडीत तिघांचं नेतृत्व आहे. आपण तर डब्बा आहे, उद्धव ठाकरे आमचं इंजिन आहे. आम्ही इंजिनच्या मागे चालणारे कार्यकर्ते आहोत. जे निर्णय ते घेतात त्याची अंमलबजावणी आम्ही करत असतो.

उद्धवसाहेब राजसाहेब (Raj Thackeray) यांच्यामधील फरक मी पाहिलाय, ज्याप्रमाणे पावसाळा हिवाळा, उन्हाळा हे ३ ऋतू आहेत त्याप्रमाणे राज ठाकरे ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत. त्यांना मी लहानपणापासून ओळखतो. हाफ चड्डीपासून मी शिवसैनिक आहे तेव्हापासून ते आमच्या जिल्ह्यात यायचे चंचल माणूस आहे, चंचल स्वभावामुळे या गोष्टी होत असतात.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT