Uddhav Thackeray Live NEWS Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Melava Live: यंदाचा दसरा मेळावा शीवतीर्थावरच; उद्धव ठाकरेंची घोषणा

उद्धव ठाकरेंनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो आणि भगिनींनो म्हणत भाषणाला सुरुवात केली.

Jagdish Patil

Uddhav Thackeray LIVE Speech: गोरेगावच्या नेस्को सभागृहामध्ये आज शिवसेनेच्या वतीने गटप्रमुखांचा भव्य मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर आणि मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज पहिल्यांदाच जाहीर सभेमध्ये बोलत होते. ठाकरे बोलत असताना शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

भाषणाला सुरुवात करतानाच उद्धव ठाकरेंनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो आणि भगिनींनो म्हणत सुरुवात केली. शिवाय यावेळी त्यांनी यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असल्याची घोषणा देखील केली.

पाहा व्हिडीओ -

राज्यात मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) शिवाजी पार्कवर कोण घेणार या मुद्यावरुन राजकारण चांगलचं पेटलं आहे. शिंदे गटाने आणि ठाकरे गटाने दोघांनी या मैदानावर मेळावा घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र, महापालिकेकडून या दोन्ही गटांना परवानगी दिलेली नाही. अशातच आता उद्धव ठाकरेंनी यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणार असल्याची घोषणा केल्यामुळे दोन्ही गटात शिवाजी पार्क वरुन संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana : दुर्दैवी! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, पाय घसरून खोल नदीत २ मुलं बुडाली

लांब केसांसाठी दालचिनीचा घरगुती सोपा उपाय करा

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: जादूटोणा प्रकरणाच्या तपासाला वेग; फिरोज शेख यांच्यावरील आरोप मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी फेटाळले

Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धी योजनेचा भन्नाट फॉर्म्युला! एवढीच गुंतवणूक करा आणि मिळवा ₹50 लाख

SCROLL FOR NEXT