मुंबई/पुणे

एक थप्पड अशी देऊ की तुम्ही उठणारच नाही

जितक्या थपडा खाल्ल्या आहेत, त्यापेक्षा जास्त दिल्या आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयुष्यात काही क्षण अनपेक्षित असतात. मी स्वप्न पाहिलं नव्हत मुख्यमंत्री पदाचं पण ती जबाबदारी स्विकारावी लागली. त्या खोलात आता जात नाही. आतापर्यंत थपडा खात आणि थपडा देत आम्ही इथपर्यंत आलो आहोत. जितक्या थपडा खाल्ल्या आहेत, त्यापेक्षा जास्त दिल्या आहेत. आता आमच्यासमोर कोणी थपडा देण्याची भाषा करु नये, आता धमक्या देऊ नका, नाहीतर आता अशी थप्पड देऊ की तुम्ही उठणारच नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

वरळी येथे सर्वाधिक म्हणजे १२१ चाळी असून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे भुमिपुजन आज करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा भुमिपुजन समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. ''या कामाच भूमिपुजन माझा हस्ते होईल याची अपेक्षा नव्हती. या चाळींचा इतिहास खूप मोठा आहे. चाळींनी अनेक माणसं आपल्याला दिली. कितीही मजली इमारती बांधल्या तरी आपण याचं ऋण फेडू शकत नाही. प्रत्येक सरकार आम्ही घर देऊ असे बोलायचे. पण आज तो क्षण उजाडला याचा कुणी विचार केला नव्हता. असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

या चाळींचा इतिहास विसरू देऊ नका. पु.ल.नी बटाट्याची चाळ पुस्तकातून इतिहास जपला. मुंबई मिळवण्यासाठी चाळीतील रक्त ज्यांनी सांडलं ते वाया जाऊ देऊ नका. स्वत:च्या हक्काची घर झाल्यानंतर आपल्या मुळाला धक्का देऊ नका. असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT