Uddhav Thackeray Latest Speech Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Latest Speech: रामलल्ला तुमची संपत्ती आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav thackeray News in Marathi: श्रीराम मंदिराच्या श्रेयवादावरूनही राजकारण सुरु झालं आहे. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. रामलल्ला तुमची संपत्ती आहे का,असा सवाल करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Vishal Gangurde

Uddhav thackeray News:

देशात राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. श्रीराम मंदिराचं उद्घाटन २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी भाजपने विशेष तयारी केली आहे. दुसरीकडे याच श्रीराम मंदिराच्या श्रेयवादावरूनही राजकारण सुरु झालं आहे. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. रामलल्ला तुमची संपत्ती आहे का,असा सवाल करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांनी यादव समाज सेवा संस्थेच्या मीरा भायंदर येथे आयोजित गोवर्धन पुजेला हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थित उत्तर भारतीयांशी संवाद साधला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, 'यादव सेवा संस्थेला मी धन्यवाद देऊ इच्छितो. मला तुमच्या कार्यक्रमात आपलं मानून बोलावलं. आता आपलं कोणाला मानायचं हे आता कठीण झालं आहे. कालपर्यंत आपल्या घरात वावरला, तो आज आपला विरोधक म्हणून समोर आलाय'.

उत्तर भारतीय आणि मराठी माणूस दूधसारखेसारखा : उद्धव ठाकरे

'आपला धनुष्यबाण चोरला. महाभारतात कृष्णाने आपल्याला शिकवण दिली, जो कोणी आपल्या विरोधात आला, त्याचा पराभव करायचा. मी भारतीय जनतेत भगवान कृष्ण पाहतो. मी तुम्हाला वचन देतो. आजची सभा राजकीय नाही. यादव आणि आपल्यात दूध साखरेचं मिश्रण आहे. पण त्यात मीठ कोण टाकतंय हे बघा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मी कोविड काळात वाचवलं असं तुम्ही म्हणताय. शिवसेनेने कोविड काळात सर्व हिंदूंना वाचवलं. आता राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. ही आनंदाची बाब आहे. त्यावेळेस जेव्हा राम मंदिर पाडलं, तेव्हा शिवसेना पुढे होती. त्यावेळी भाजप कुठे नव्हतीच,असेही ते म्हणाले.

ठाकरेंची भाजपवर टीका

'काही राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळेस सांगितलं की, भाजपला मत दिलं तर रामलल्लाचं मोफत दर्शन करणार. रामलल्ला तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे काय? आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम असं आहे. भाजपला मत दिलं तर मोफत रामलल्लाचं दर्शन, हे कसलं हिंदुत्व? महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत. सूरत मजबूत होगा, तो देश मजबूत होगा म्हणत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

SCROLL FOR NEXT