Shinde Group vs Thackeray Group 
मुंबई/पुणे

श्रीकांत शिंदेंच्या घरासमोरून जात होता उद्धव ठाकरेंचा ताफा, शिवसैनिकांच्या जोरदार घोषणा, VIDEO पाहा

Shinde Group vs Thackeray Group: आज उबाठा गटाचे उमेदवाराच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे डोंबिवलीमध्ये सभा घेत आहेत.एकीकडे निवडणूक प्रचाराचा धुराळा उडाला असता दुसरीकडे उबाठा आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचलाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अभिजीत देशमुख)

कल्याण : डोबिंवलीमध्ये उबाठा गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले असून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय. उबाठाचे लोकसभेचे उमेदवाराच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे डोंबिवलीमध्ये आलेत. त्यावेळी त्यांचा ताफा शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या घरासमोरून गेला. त्यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाहून श्रीकांत शिंदेच्या समर्थनात घोषणा दिल्या.

राज्यातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडत असून प्रचाराने वेग धरलाय.आज उबाठा गटाचे उमेदवाराच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे डोंबिवलीमध्ये सभा घेत आहेत. एकीकडे निवडणूक प्रचाराचा धुराळा उडाला असता दुसरीकडे उबाठा आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचलाय. प्रचारानिमित्त दोन्ही गटातील नेते एकमेकांसमोर आले तर कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत डिवचत असतात.

आज उद्धव ठाकरे हे डोंबिवलीमध्ये उबाठा गटाचे उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेत. त्यादरम्यान त्यांच्या वाहनाचा ताफा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपूत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानासमोरून गेला,त्यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी श्रीकातं शिंदे यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत ठाकरेंना डिवचलं. आज दुपारी मुख्यमंत्री रोड शो करत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत त्यांना डिवचलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनुष्यबाणाचे अॅक्शन करत त्यांना उत्तरल दिलं. आता त्या घोषणांचा बदल शिंदे समर्थकांनी डोंबिवलीत घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

SCROLL FOR NEXT