mit college students met with an road accident, saswad kapurhol road, accident, pune, narayanpur  saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident News : मंगळवार ठरला घातवार; एमआयटी काॅलेजचे दाेन विद्यार्थी भीषण अपघातात ठार, पाच जखमी

मंगेश कचरे

Saswad Kapurhol Accident News : पुण्याहून (pune) नारायणपूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या एमआयटीच्या विद्यार्थ्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात (accident) दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. (Breaking Marathi News)

हा अपघात सासवड कापूरहोळ रस्त्यावर (saswad kapurhol accident today) झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी घटनास्थऴी धावले. त्यांनी मदत कार्य तातडीने सुरु केले.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या अपघातात रचित मेहता, गाैरव लालवाणी या दाेघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामधील जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (LIVE Marathi News)

अपघातग्रस्त विद्यार्थी हे वेगवेगळ्या राज्यातील आहेत. ते पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Latest Marathi News)

यावेळी नारायणपूरच्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढून सासवड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रचित मेहता व गौरव लालवाणी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली. दरम्यान पाच जखमी युवकांना पुढील उपचारासाठी सुसून येते पाठवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळतात सासवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT