pune news saam tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यातील दोन रस्ते 31 डिसेंबरच्या रात्री पूर्णत: बंद राहणार; हुल्लडबाजीही पडेल महागात

एफसी रोड तसेच एमजी रोड या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर "थर्टी फर्स्ट" साजरा करण्यासाठी तरुणाई येत असते.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : नवीन वर्षाच्या स्वागतावेळी म्हणजे 31 डिसेंबरच्या रात्रीची मद्यपी मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. अनेकजण दारु पिऊन नियम अक्षरश: पायदळी तुडवतात. मद्यपींच्या निष्काळजीपणामुळे अपघात होण्याचा धोका देखील मोठा असतो. हाच धोका ओळखून पुणे पोलिसांना सावध भूमिका घेतला आही. 31 डिसेंबर रोजी पुण्यातील 2 प्रमुख रस्ते "नो वेहिकल झोन" होणार आहेत.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (एफसी रोड) आणि महात्मा गांधी रस्ता (एमजी रोड) वाहनांसाठी बंद राहणार आहेत. पुण्यातील या दोना प्रमुख रस्त्यांवर संध्याकाळी 7 नंतर गर्दीचा आढावा घेतल्यानंतर वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहेत, अशा माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे. (Latest Marathi News)

एफसी रोड तसेच एमजी रोड या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर "थर्टी फर्स्ट" साजरा करण्यासाठी तरुणाई येत असते. यामुळे वाहतूक कोंडी होते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. याच अनुषंगाने हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.

दारु पिऊन गाडी चालवली तर खबरदार

यावळे ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांना 1000 रुपये दंड तसेच वाहन देखील जप्त करण्यात येऊ शकते. दोन वर्षाच्या कालावधीनंतर ब्रेथ अ‍ॅनालायझर वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी पोलिसांकडून यंदा 100 ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनचा वापर होणार आहे.

चालकाची प्रथम ब्रेथ अ‍ॅनालायझरने तपासणी केली जाईल. जी व्यक्ती नशेत असल्याचे आढळल्यास, कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहेत. थर्टी फर्स्ट साजरी करणाऱ्यांवर पोलिसांचे पथक नजर ठेवणार आहे.रस्त्यात धांगडधिंगा, विनाकारण आरडाओरडी करणे देखील महागात पडू शकते.एकूण 4000 पोलीस तैनात असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

SCROLL FOR NEXT