Kalachowki Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांची फसवणूक करण्याऱ्या दोघांना अटक

चौधरी यांच्या खात्यातून तब्बल ७८ लाख काढण्याचा प्रयत्न केला होता.

सुरज सावंत

मुंबई - शिवडी मतदारसंघाचे शिवसेनेचे (Shivsena) आमदार अजय चौधरी यांची फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींनी चेकवर बनावट स्वाक्षरीकरून चौधरी यांच्या खात्यातून तब्बल ७८ लाख काढण्याचा प्रयत्न केला होता. चेकची सत्यता पडताळण्यासाठी बँक (Bank) अधिकाऱ्यांनी चौधरी यांना फोन केला असता. हा फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. सूकेतू दवे आणि जयेश चंद्रकांत शहा अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

हे देखील पाहा -

यातील दवे हा गुजरातच्या अहमदाबादचा रहिवाशी असून शहा हा कांदिवलीचा राहणारा आहे चौधरी यांना आमदार म्हणून मिळणारे मासिक वेतन मुंबईच्या लालबाग बँकेत जमा होत होते. मात्र आरोपींनी चौधरीची बनावट स्वाक्षरी असलेला चेक अहमदाबादच्या नारनपुरा ब्रॅन्च मध्ये जमा केल्याने बँक अंधकाऱ्यांना संशय आला. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या फसवणूकीत अन्य कोणाचा सहभाग आहे याचा तपस सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT