Thane News Saam Tv
मुंबई/पुणे

इमारतीची पाण्याची टाकी साफ करताना दोन कामगारांचा मृत्यू, दोघांची परिस्थिती गंभीर

नौपाडा भागात असणाऱ्या मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीवरील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी हे कामगार पाण्याच्या टाकीत उतरले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे - निवासी इमारतीवरील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या चार कर्मचाऱ्यांपैकी 2 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर दोघांची परिस्थिती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांवर खासगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. नौपाडा भागात असणाऱ्या मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीवरील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी हे कामगार पाण्याच्या टाकीत उतरले होते. त्यावेळी हा अपघात घडला आहे.

पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत टाकलेल्या केमिकलचे गॅस तयार झाल्याने चौघं जण टाकीत गुदमरल्याने ही घटना घडली आहे. काल दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. दोन्ही पीडितांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपस सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT