नारायण राणेंचे जामिनावर सुटल्यानंतर सूचक टि्वट Saam Tv
मुंबई/पुणे

नारायण राणेंचे जामिनावर सुटल्यानंतर सूचक टि्वट

कालच्या या संपूर्ण घटनाक्रमावर आज नारायण राणे काय बोलणार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - काल रात्री उशिरा महाड सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांना अखेर जामीन मंजूर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे काल दिवसभर शिवसेनेने Shivsena नारायण राणे यांच्या या वक्तव्याविरोधात राज्यभर आंदोलने केली.

हे देखील पहा -

काही ठिकाणी बॅनरला काळं फासलं, प्रतिकात्मक पुतळण्याचे दहन केले तर काही जागी त्यांचे पोस्टर फाडून निषेध करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी रात्री राणे यांना कोर्टात हजर केले असता महाड कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नारायण राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी कोर्ट परिसरात जल्लोष केला.

दरम्यान, नाशिक आणि पुणे पोलीस नारायण राणे यांचा ताबा घेणार नाहीत असे देखील यावेळी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. नारायण राणे यांना कोर्टाकडून सर्शत जामीन मिळाल्यानंतर त्यांनी एक टि्वट केले आहे. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये सत्यमेव जयते असे लिहिले आहे. कालच्या या संपूर्ण घटनाक्रमावर आज नारायण राणे काय बोलणार? भाजपा कशा पद्धतीने शिवसेनेला प्रत्युत्तर देणार? याकडे आता सर्व्यांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

राहुल गांधींकडून कार्यकर्त्यांचा विश्वासघात; काँग्रेसच्या महिला नेत्याचे गंभीर आरोप

Breastfeeding Mothers : बालकांना स्तनपान करणाऱ्या मातांसाठी या ५ गोष्टी नक्की कराव्यात, तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर फेरीवाल्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT