"इटालियन विचारधारेशी जवळीक केल्याने, उद्धव ठाकरेंना हिंदुंच्या रूढी, परंपरा ढोंग वाटत आहेत" SaamTV
मुंबई/पुणे

"इटालियन विचारधारेशी जवळीक केल्याने, उद्धव ठाकरेंना हिंदुंच्या रूढी, परंपरा ढोंग वाटत आहेत"

सत्ता काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच ढोंग केलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : इटालियन विचारधारेशी जवळीक केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना CM Uddhav Thackeray आता हिंदुच्या रूढी, परंपरा आणि विधी हे सर्व ढोंग वाटायला लागले आहे. अशी टीका भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले Tushar Bhosale यांनी उद्धव ठाकरेंवरती केली आहे. (Tushar Bhosale has criticized Uddhav Thackeray)

हे देखील पहा -

पितृपक्ष म्हणजे भोंदूगिरी असल्याचा वक्तव्यं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे Prabodhankar Thackeray यांच्‍या प्रबोधन या नियतकालिकातील लेखक संग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले "जेव्हा एखादी गोष्ट करायची आहे आणि तेव्हा पित्रुपक्ष आहे असे विचारले जाते तेव्हा मी माझा पक्षच पितृपक्ष आहे असं सांगतो, तो माझ्या वडीलांचा पक्ष आहे ना म्हणून तसेच पितृपक्ष म्हणजे भोंदुगिरी आहे. आमचे हिंदुत्व Hindutva हे शेंडी-जानव्याचे नाही असही ते यावेळी म्हणाले होते त्यांच्या याच वक्तव्यावरुन तुषार भोसलें यांनी ठाकरेंवरती टीका केली आहे.

भोसले म्हणाले 'गेल्या दोन दिवसाच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणांमधून असं दिसून येत आहे की आजपर्यंत सत्ता काबीज करण्याकरताच उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी असल्याचा ढोंग केलं आणि त्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. 'ढोंगी हिंदू नाही, तर ढोंगी उद्धव ठाकरे आहेत.' आणि त्यांनी हिंदुत्वाचं ढोंग केलं होतं ते समोर आलं आहे असं भोसले म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT