Turkey Saam Tv
मुंबई/पुणे

Turkey: सफरचंद, ड्रायफ्रुट सोडा पुण्यातील भूमिगत मेट्रो स्थानके तयार करणारी कंपनी तुर्कीची

Pune Metro Stations Made by Turkey Company: पाकिस्तानची मदत करणाऱ्या तुर्कीचा संपूर्ण देशातून विरोध होत आहे. तुर्कीच्याच एका कंपनीने पुण्यातील अंडरग्राउंड मेट्रोची स्थानके तयार केली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

गेल्या २ दिवसांपासून पाकिस्तानची मदत करणाऱ्या तुर्कीचा संपूर्ण भारतातून विरोध होतोय. तुर्की चे सफरचंद, ड्रायफ्रूट्स ते अगदी तुर्कीमधून येणाऱ्या बहुतांश वस्तूंवर आता बहिष्कार टाकायला सुरुवात झाली आहे. अशातच आता पुण्यातील बहुचर्चित भूमिगत मेट्रो चे काम टर्किश कंपनी गुलेरमॅक कडे आहे. महा मेट्रो कडून २०१९ मध्ये पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या भूमिगत मार्गावर असलेल्या तीन स्टेशनच्या टनलिंगसाठी निविदा जाहीर करण्यात आली होती. अनेक कंपन्यांनी हा प्रकल्प मिळावा यासाठी प्रयत्न केला होता मात्र अखेर हे काम टाटा प्रोजेक्ट आणि टर्किश कंपनी गुलेरमॅक यांना जॉइंट वेंचर म्हणून मिळाले.

या प्रकल्पासाठी २२८३ कोटी रुपयांचा करार झाला. यामध्ये पहिल्या २.५ किलोमीटरसाठी ११२७ कोटी रुपये तर दुसऱ्या २.५ किलोमिटर साठी ११५६ कोटी रुपये एवढी किंमत होती. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गाच्या एकूण १६.६५ किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉर-I मधील ५.०१९ किलोमीटरचा भाग कसबा पेठ, बुधवार पेठ आणि मंडई या सारख्या दाट लोकवस्तीच्या भागांमधून गेला आहे. सिव्हिल कोर्ट आणि स्वारगेट हे सुद्धा भूमिगत मेट्रो स्टेशन आहेत अशा एकूण ५ स्थानकांच्या टनलिंगसाठी या कंपनीला काम देण्यात आले.

९ जुलै २०१९ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली होती तसेच ऑक्टोबर २०१९ मध्ये टनल बोरिंग मशीन आणल्या गेल्या. या मशीन ची किंमत साधारण ५० कोटी रुपये इतकी असल्याचं बोलले जातं. बोगदा तयार करण्यासाठीच्या मशीन आणल्यानंतर खऱ्या अर्थाने भूमिगत असणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या कामाला प्रारंभ झाला. नोव्हेंबर २०१९ मध्ये पहिल्या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. जानेवारी २०२० मध्ये पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर असलेल्या रेंजहिल ते स्वारगेट या मार्गाच्या कामाचे उद्घाटन तेव्हाचे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. मागील वर्षी सप्टेंबर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचे लोकार्पण केले.

गुलेरमॅक ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर

ऑक्टोबर २०२४ मध्ये पुणे मेट्रो चे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा दिली होती. "भारतातील पुण्यातील दोन प्रमुख मेट्रो प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही जून २०२३ मध्ये पुणे मेट्रो पॅकेज १ आणि सप्टेंबर २०२४ मध्ये पुणे मेट्रो पॅकेज २ पूर्ण केले,"अशी पोस्ट त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर केली होती.

गुलेरमॅक ही तुर्कीमधील आघाडीच्या इंजिनियरिंग आणि बांधकाम कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासाठी प्रकल्पांच्या रेल्वे, भूमिगत बोगदे आणि सबवे स्टेशन चे कामं करते.

मागील वर्षी या सर्व मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झालेले असून पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोमधून आज हजारो प्रवासी प्रवास करत आहेत. एका बाजूला टर्की देशांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला जातोय पण दुसऱ्या बाजूला आज ही भारतात अनेक प्रकल्प आहेत ज्याचे काम गुलेरमॅक अशा टर्किश कंपन्यांना दिले गेले आहे. साहजिकच ज्यावेळी या कंपन्यांसोबत आपल्या सरकार ने करार केले तेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात असलेला तणाव इतक्या टोकाला जाईल असं वाटलं नव्हतं. २०१९मध्ये सुरू झालेला प्रकल्प आता पूर्ण झाला आहे, त्यावेळी आपले तुर्कीसोबतचे संबंध वाईट नसल्याने हा प्रकल्प त्यांना देण्यात आला होता. मात्र आता पाकिस्तानला जाहीर पाठिंबा देत असलेल्या तुर्की विरोधात आता भारत सरकार आगामी काळात आणखी काय कठोर भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Youtuber Death: प्रसिद्ध युट्यूबरचा वयाच्या ३१ व्या वर्षी संशयास्पद मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह, मनोरंजन सृष्टीत खळबळ

Russian model viral video: जवळ आला, हात लावण्याचा प्रयत्न केला आणि...! लगट करणाऱ्याला रशियन महिलेने शिकवला धडा

Messy Braid Hairstyle For Long Hair: लांब केसांवर शोभून दिसेल 'मेसी वेणी', लग्नात तुम्हीच दिसाल सुंदर

Instagram Down : अचानक इंस्टाग्राम झालं ठप्प, रील प्रेमींचा जीव टांगणीला, भन्नाट मीम्सचा पाऊस

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT