व्यसनाना आळा घालण्यासाठी तुळींज पोलिसांचा पुढाकार; युवकांसाठी राबवला नशामुक्तीचा उपक्रम! चेतन इंगळे
मुंबई/पुणे

व्यसनाना आळा घालण्यासाठी तुळींज पोलिसांचा पुढाकार; युवकांसाठी राबवला नशामुक्तीचा उपक्रम!

नशामुक्ती मार्गदर्शन केंद्राचा संपूर्ण खर्च तुळींज पोलिसांतर्फे केला जाणार आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

नालासोपारा : नालासोपारा (Nalasopara) परिसरात वाढते अंमली पदार्थाचे (Drugs) जाळे तोडण्यासाठी तुळींज पोलिसांनी पुढाकार घेत पोलिसांच्या जिल्ह्यातील पहिले नशामुक्ती मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे. शहरातील तरुणांमधील वाढते व्यसनाचे (Addiction) प्रमाण पाहता नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सामजिक हित जोपासण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. याचा संपूर्ण खर्च तुळींज पोलिसांतर्फे केला जाणार आहे. (Tulinj police initiative to curb addiction)

हे देखील पहा-

नालासोपारा परिसरात मागील काही महिन्यात टाळेबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात असल्याचे आठळून आले होते. मोठ्या प्रमाणात लपूनछपून युवक नशापान करताना गस्तकरणाऱ्या पोलिसांना आढळून येत आहेत. यामुळे अंमली पदार्थाचे व्यापार करणारे सुद्धा शहरात फोफावत होते. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे (Senior Police Inspector Rajendra Kamble)यांनी मुळावर घाव घालत व्यसन करणाऱ्या युवकांना मार्गावर आणल्यास या धंद्याला आळा घालता येयील. तसेच युवक सुद्धा चांगल्या मार्गाला लागतील असा आशावाद ठेवत त्यांनी तुळींज पोलीस ठाण्याच्या (Tulinj Police Station) लगत साई बाजार येथे जागा घेत हे केंद्र सुरु केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT