TET Exam घोटाळ्यात तुकाराम सुपेचा ड्रायव्हरही सहभागी  Saam TV News
मुंबई/पुणे

TET Exam घोटाळ्यात तुकाराम सुपेचा ड्रायव्हरही सहभागी

घोलप याने स्वतंत्ररीत्या विद्यार्थ्यांची नावे त्याच्या साथीदाराला पाठविली आहेत.

अमोल कविटकर, पुणे

पुणे : महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याने पाठवलेली विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकिट त्याच्या कार्यालयीन गाडीवर चालक असलेला सुनील घोलप इतर आरोपींना पाठवत असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. घोलप यासह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे. घोलप याने २०२० मधील टीईटीमध्ये (TET Exam) अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले आहे. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉटस्अपवर पाठवीत असे त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवीत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे, घोलप याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून व्हॉटस्अप चॅटिंग बाबत पुरावा हस्तगत करायचा आहे.

घोलप याने स्वतंत्ररीत्या विद्यार्थ्यांची नावे त्याच्या साथीदाराला पाठविली आहेत. तर, डोंगरे हा सुपे व शिक्षण विभागात खासगी कंपनीचा तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत असणारा अभिषेक अजय सावरीकर या दोघांच्या संपर्कात होता, अशी माहिती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली. डोंगरे याला तीन लाख २५ हजार रुपये मिळाल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी अ‍ॅड. जाधव यांनी केली. न्यायालयाने त्यांना तीन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

SCROLL FOR NEXT