Accident News Saam tv
मुंबई/पुणे

अंबरनाथमध्ये ट्रकची कार आणि रिक्षाला धडक; एक जखमी

हुतात्मा चौकातील जिजामाता जिमसमोर अपघात

अजय दुधाणे

उल्हासनगर - अंबरनाथमध्ये (Ambernath) एका ट्रकने कार आणि रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली. हुतात्मा चौकाकडून स्वामी समर्थ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जिजामाता जिमसमोर हा अपघात घडला. या अपघातात रिक्षेतला एक प्रवासी जखमी झाला. हुतात्मा चौकाकडून स्वामी समर्थ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जिजामाता जिमसमोर कारचालक गणेश आवटे यांनी त्यांनी इको गाडी उभी केली होती. तर त्यांच्या कारच्या समोरच एका रिक्षाचालकाने त्याची रिक्षाही लावली होती.

हे देखील पाहा -

यावेळी हुतात्मा चौकाकडून आलेल्या एका आयशर ट्रकने इको कारला धडक दिली, त्यामुळं इको कार रिक्षेला आणि रिक्षा समोरच्या पथदिव्याच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात रिक्षेत बसलेला अर्जुन पाटील हा प्रवासी जखमी झाला. तर कार आणि रिक्षा या दोन्ही वाहनांचं नुकसान झालं.

या अपघातानंतर आयशर ट्रकचा चालक ट्रक घेऊन तिथून पळून गेला. यावेळी कारचालक गणेश आवटे यांनी पाठलाग करून ट्रकच्या क्लिनरला पकडून आणलं, तर चालक मात्र पळून गेला. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नसून ट्रक मालक आणि नुकसानग्रस्त वाहनचालक यांनी आपसात समझोता करून प्रकरण पोलीस ठाण्याबाहेरच मिटवल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Fraud Company : 'टोरेस' नंतर 'या' कंपनीने घातला गरजूंना लाखोंचा गंडा; नेमकं काय प्रकरण ?

Maharashtra Live News Update: घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

Mizoram First Railway: १७२ वर्षानंतर देशातील या राज्याला मिळाली पहिली रेल्वे; कुठून कुठपर्यंत धावणार?

Tanya Mittal Ex Boyfriend Arrested: 'बिग बॉस १९' फेम तान्या मित्तलच्या एक्स बॉयफ्रेंडला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Govind Barge case : गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, पूजाचे पाय आणखी खोलात, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT