Pune Bangalore National Highway Accident News, Ganpati Festival, Khambatki Ghat saam tv
मुंबई/पुणे

Pune Bangalore National Highway Accident News : पुणे- बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, जाणून घ्या खंबाटकी घाटातील वाहतूकीची स्थिती

Traffic Update : गणेशाेत्सव जवळ आल्याने महामार्गावरुन सातारा, काेल्हापूरला जाणा-यांची वाहनांची वर्दळ वाढली आहे.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune News : पुणे- बंगळुरू महामार्गावर आज (शनिवार) नवीन कात्रज बोगद्याजवळ झालेल्या अपघातामुळे वाहतुक विस्कळीत झाली. तसेच गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमनी साता-याकडे परतू लागल्याने सकाळपासून खंबाटकी घाटातील वाहतुक संथ गतीने सुरु आहे. (Maharashtra News)

आज सकाळी अकराच्या सुमारास नवीन कात्रज बोगद्याजवळ एका ट्रकने पाठीमागून दूस-या ट्रकला धडक दिली. त्यामुळे दुसरा ट्रक रस्त्यावरच उलटला. या अपघातात दोन्ही ट्रक चालक जखमी झाले.

या अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीसांनी धाव घेतली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली हाेती. दरम्यान क्रेनच्या मदतीने ट्रक हटवण्याच काम सुरू करण्यात आले हाेते.

खंबाटकीत वाहतुक काेंडी

गणेशाेत्सव (ganesh festival 2023) तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे पुणे मुंबईतील साता-याचे चाकरमनी गावाकडे येऊ लागले आहेत. यामुळे खंबाटकी घाटात (Khambatki Ghat Traffic Update) वाहनांची वर्दळ वाढली आहे. आज सकाळपासून या घाटातील वाहतुक संथ गतीने सुरू आहे. पुण्याकडून साता-याला येणा-या मार्गात अधून मधून वाहतुक काेंडी देखील हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT