खेड तालुक्यातील डेहणे आणि पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात ट्रामा युनिट... रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

खेड तालुक्यातील डेहणे आणि पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात ट्रामा युनिट...

खेड तालुक्यातील डेहणे आणि पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण आरोग्य केंद्र आणि ट्रामा युनिट सुरु करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदने हातभार लावला आहे.

रोहिदास गाडगे

पुणे: उत्तर पुणे जिल्ह्यातील आदिवासी डोंगराळ भागातील नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानातुन विकसीत असलेली रुग्णसेवा मिळावी यासाठी खेड तालुक्यातील डेहणे आणि पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण आरोग्य केंद्र आणि ट्रामा युनिट सुरु करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदने हातभार लावला आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख ,शरद बुट्टेपाटील यांनी शासकिय पातळीवर प्रयत्न केले आहेत. (Trauma unit at Dehne and Pite Primary Health Center in Khed taluka ...)

हे देखील पहा -

डोंगराळ आदिवासी भागातील नागरिकांना अतितातडीची आरोग्यसेवा मिळण्याकरिता मोठा संघर्ष करावा लागत होता. यावेळी आदिवासी भागातील जिल्हा परिषद अतुल देशमुख आणि शरद बुट्टेपाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करुन ट्रामा युनिट सुरु करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला होता, यावेळी ३१ मे २०२१ च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

खेड तालुक्यातील डेहणे आणि पाईट येथील ट्रामा युनिट पुर्ण क्षमतेने सुरु झाल्यास पुढील काळात डोंगराळ आणि आदीवासी भागातील नागरिकांच्या आरोग्य समस्येचा प्रश्न मिटणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषद सदस्य अतुल देशुमख, शरद बुट्टेपाटील यांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT