Mumbai Latest News: Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Latest News: आवडत्या तरुणाला दुसऱ्या मुलीसोबत पाहिलं; एकतर्फी प्रेमातून तृतीयपंथीयाने उचललं टोकाचं पाऊल

Mumbai Malad Crime News: मुंबईच्या मालाडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमात आकंठ बुडालेल्या एका तृतीयपंथीयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Mumbai Crime News In Marathi:

मुंबईच्या मालाडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमात आकंठ बुडालेल्या एका तृतीयपंथीयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी ही घटना घडली. मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात एका तृतीयपंथीने जीवनयात्रा संपवली. एकतर्फी प्रेमात बुडालेल्या एका तृतीयपंथीयाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. अलविना खान असं मृत तृतीयपंथीयाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण काय?

अलविनाचे एका तरुणावर एकतर्फी प्रेम होते. मात्र, अलविनाने त्या तरुणाला दुसऱ्या मुलीसोबत पाहिले. त्यानंतर अलविनाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रेमात आलेल्या अपयशामुळे ही आत्महत्या करण्यात आली किंवा यामागे दुसरे काही कारण आहे का, याचा मालवणी पोलीस शोध घेत आहे.

प्रेयसीसोबत भांडण झाल्याने पोलिसाने उचललं टोकाचं पाऊल

प्रेयसीसोबत भांडण झाल्याने वरळीत पोलीस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गेल्या रविवारी रात्री वरळीच्या जलतरण तलावाजवळील लोखंडी ग्रीलला गळफास घेतला होता. इंद्रजित साळुंखे (२७) असं या पोलीस शिपायाचे नाव आहे. तो एल ए विभाग १ मध्ये कार्यरत होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आत्महत्येपूर्वी प्रेयसीला दादर येथे सोडून आल्यानंतर प्रेयसीला गळफास घेत असल्याचा मेसेज व फोटो पाठवत टोकाचे पाऊल उचलले. पोलीसाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर पोलिसाने आत्महत्येनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

Sugar Vs Rocksugar: साखर आणि खडीसाखर, चहासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

SCROLL FOR NEXT