Pune Accident Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, दीर भावजयाचा अपघाती मृत्यू, कारच्या धडकेत दुर्देवी अंत

Pune Accident News: पुण्यात चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक बसलीय. समोरासमोर बसलेली धडक इतकी जोरदार होती की, यात दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दीर आणि भावजयाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

Bhagyashree Kamble

पुणे विमानतळानजीक भीषण अपघात घडलाय. चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक बसलीय. समोरासमोर बसलेली धडक इतकी जोरदार होती की, यात दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दीर आणि भावजयाचा अपघाती मृत्यू झालाय. अपघातामध्ये आशीर्वाद नागेश गोवेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर, भावजया रेश्मा रमेश गोवेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अपघाताची नोंद विमानतळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या भीषण अपघातानंतर कारचालक स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले आहे.

याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईबा पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत आशीर्वाद गोवेकर आणि रेश्मा गोवेकर यांचे नाते दीर आणि भावजय असे आहे. रेश्मा यांची तब्येत बिघडल्यानं आशीर्वाद गोवेकर दुचाकरीवरून त्यांना, खासगी रूग्णालयात घेऊन आले होते. उपचार घेतल्यानंतर दोघे दुचाकीवरून घरी निघाले होते.

रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर येरवडा ते विमानतळ या मुख्य रस्त्यावरून उजवीकडे (फाईव्ह नाइन) चौकाकडे वळत होते. दुचाकी वळण घेतं असताना येरवड्याच्या दिशेनं जाणारी बस आणि इतर वाहनं थांबलेली होती. याच दरम्यान फाईव्ह नाइनच्या दिशेनं भरधाव वेगानं चारचाकी आली. चारचाकी वाहनानं बस आणि इतर वाहनांना ओव्हरटेक केलं. नंतर चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की यात आशीर्वाद नागेश गोवेकर यांचा जागीच मृत्यू झाला.

तर, रेश्मा गोवेकर या गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना जवळील खासगी रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपाचारादरम्यान त्यांचाही दुर्देवी मृ्त्यू झाला. या भीषण अपघातानंतर चारचाकी आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी रेश्मा यांची मुलगी हिनं विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. कारचालकाचे नाव अचलकुमार आणि नरेंद्र कुमार प्रसाद असे असून, अपघातानंतर कारचालक स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Hairstyles: मेसी वेणी आणि बबल पोनीटेल, ऑफिस आणि कॉलेजसाठी 5 मिनिटांत होतील अश्या झटपट 5 हेअरस्टाईल्स

Kidney disease symptoms: किडनी खराब होण्याआधी ही लक्षणं लगेच ओळखा, मान आणि चेहऱ्यावर मिळतात संकेत

Health Tips : मानेचं दुखणं हे तीव्र डोकेदुखीचं कारण असू शकतं का? तज्ज्ञांनी सांगितलं, असं का होतंय?

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

SCROLL FOR NEXT