Mumbai Pune ExpressWay Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवरुन प्रवास करण्याचा विचार करताय? आधी ही बातमी वाचा, मोठा मनस्ताप टळेल

पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai-Pune Expressway: रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुणे महामार्गावरून कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर थोडं थांबा. कारण मुंबई-पुणे महामार्गावर कळंबोलीजवळ वाहतूक जवळपास तीन तास बंद राहणार आहे. त्यामुळे याठिकाणी काही वेळ वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

मुंबई -पुणे एक्स्प्रेसवेवर पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. कळंबोली गावाजवळ ओव्हर हेड ग्रँट्री उभारण्याचे काम राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. या कामासाठी आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत कळंबोली गावापासून काही अंतरापर्यंत वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे. वाहतूक कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश इन हॉटेलजवळून पनवेल रॅम्पपासून पुन्हा द्रुतगती मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे. (Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT