Railway News : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कसाराकडे जाणारी वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. खर्डी-कसारादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
रेल्वेची अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून इंजिनमध्ये दुरुस्ती करण्याचं काम सुरुआहे. अर्ध्या तासा पासून वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. दुरुस्तीसाठी आणखी आर्धा तास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल देखील खर्डी-उंबरमाली दरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडले होते. आज पुन्हा याच डाऊन मार्गावर मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज पुन्हा लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.