मुंबई/पुणे

Mumbai Pune Express Way : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी कायम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Pune Express Way Traffic Jam : एक्सप्रेस वे वरील बोर घाट आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील घाट रस्तात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

दिलीप कांबळे

Raigad News :

सलग सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळी निघाले आहेत. मात्र एकाच वेळी वाहनांची संख्या वाढल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील ट्रॅफिक जाम कायम आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर शनिवारी दुपारपासूनच वाहनांची संख्या वाढली होती. वीकेंड आणि नाताळ सणांच्या सलग सुट्ट्यांमुळे बाहेर फिरायला निघालेले मुंबईकर मात्र घाट रस्त्यात अडकले. एक्सप्रेस वे वरील बोर घाट आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील घाट रस्तात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

मुंबई पुणे एक्सप्रेस वेसह जुन्या हायवेवर खोपोलीजवळ बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोल नाका ते अमृतांजन ब्रिज तसेच खंडाळा लोणावळा एक्झिटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई-पुणे जुन्या मार्गांवरून बोरघाटात पुण्याकडे जाताना खोपोली ते खंडाळापर्यंत 10-12 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

ट्रॅफिक जाममुळे नागरिकांना अनेक समस्यांना समोरं जावं लागत आहे. अनेक वाहनं देखील इंजिन गरम झाल्यामुळे बंद पडल्या होत्या. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

कारला अपघात, तीन जण गंभीर जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर ओर्झेडे गावच्या हद्दित मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलं आहे. सर्व प्रवासी पिंपरी-चिंचवडला निघाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT