thane belapur traffic jam saam tv
मुंबई/पुणे

Thane Traffic Update : घाेडबंदर, बेलापूर, भिवंडी मार्गावर वाहतूक कोंडी (व्हिडिओ पाहा)

वाहतुक काेंडीचा ठाणेकरांना बसला फटका.

साम न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील उड्डाणपुलावर खड्डे (potholes) बुजविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील (bridge) एक लेन बंद करण्यात आली आहे. परिणामी ठाणे बेलापूर मार्गावर माेठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (traffic jam) झाली आहे. प्राथमिक माहितीनूसार वाहनांच्या दाेन किलाेमीटर रांगा लागल्या आहे. (thane belapur traffic update)

ठाणे बेलापूर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे बेलापूर रोडवर ठाण्याला जायच्या मार्गिकेवर ही वाहतूक झाली. कोपरखैरणे ते पावणे पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली. तब्बल दाेन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या पहायला मिळत आहेत. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

- विकास काटे

दरम्यान गत आठवड्यात ठाण्यातील घोडबंदर रोड वरून नाशिक आणि शहरातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे याचा फटका ठाणेकर नागरिकांना बसला आहे. मागील आठवड्यात ज्या प्रमाणे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अशीच कोंडी आज देखील निर्माण झाली. गेल्या चार तासांपासून तीन किलोमिटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.

भिवंडी रोडवर वाहतुक काेंडी

आज सकाळ पासून ठाणेकर नागरिकांना घोडबंदर रोड वरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असतानाच आता ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून नाशिक दिशेने जाणारा भिवंडी रोडवर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT