Tractor accident saam tv
मुंबई/पुणे

चहाची तलप आली अन् अपघात झाला, ट्रॅक्टरने दिली ७ वाहनांना धडक, त्यानंतर...

विनाचालक ट्रॅक्टरने सात वाहनांना धडक दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे : बिबवेवाडी येथे अप्पर जुना बस स्टॉपजवळ (Accident News)अपघात झाला आहे. एका ट्रॅक्टरने ७ वाहनांना धडक दिली आहे. ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या उतारावर ट्रॅक्टर थांबवला होता. मात्र, चालकाला चहाची तलप आवरता आली नाही. त्यामुळे उतारावर ठेवलेला (Tractor Accident) ट्रॅक्टर आपोआपच सुरु झाला. दरम्यान, या ट्रॅक्टरने ७ वाहनांना धडक दिली. या अपघातात एक जण जखमी झाला असून ट्रॅक्टर चालकाविरोधात बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये (Police complaint) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रॅक्टर चालकाला चहा पिण्याचा मोह आवरला नाही. त्या चालकाने भररस्त्यात उतारावर ट्रॅक्टर थांबवला. त्यानंतर चालक चहा पिण्यासाठी गेला असता उतारावरुन अचानक ट्रॅक्टर खाली जावू लागला. त्यानंतर या ट्रॅक्टरची धडक ७ वाहनांना बसली. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात बिबवेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पुण्यातील बिबवेवाडी येथील अप्पर जुना बस स्टॉप येथे एक भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरच्या झालेल्या या अपघातात एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. बिबवेवाडीतील अप्पर जुना बस स्टॉप येथे एक ट्रॅक्टर चालक आपली ट्रॅक्टर उभा करून चहा घ्यायला गेला, मात्र तो हॅन्ड ब्रेक लावायला विसरला आणि तसाच निघून गेला. दुर्दैवाने तो सगळा रस्ता उताराचा असल्याने तो ट्रॅक्टर आपोआप पुढे गेला आणि उतार असल्याने त्या ट्रॅक्टरची वेग वाढला आणि ट्रॅक्टरने ७ वाहनांना धडक दिली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे...; 'हा' अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update: बीडमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ

Haldi Yellow Saree Designs: हळदीला पिवळ्या रंगाची साडी का नेसतात? माहितीये का?

Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवल्याने होतील 'हे' जबरदस्त फायदे, जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य पध्दत

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा इतकी झाली किंमत, वाचा 22k, 22k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT