NIA Saam TV
मुंबई/पुणे

बॉलिवूडनंतर आता टॉलिवूडचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड; एनआयएच्या तपासात खळबळजनक माहिती आली समोर

डी कंपनीतील घरातील व्यक्तीही टॉलवूडमध्ये काम करून आपले नशीब आजमावत आहेत.

सूरज सावंत

मुंबई : बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आता याबाबच फार चर्चा होत नसली तरी अनेक कलाकारांचे डी कंपनीशी संबंध असल्याचं याआधी समोर आलं होतं. मात्र आता बॉलिवूडनंतर टॉलिवूडचं देखील अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या तपासात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीचं टॉलीवूड कनेक्शन समोर आले आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांत टॉलीवूडचे वर्चस्व वाढले असून बॉलिवूड तुलनेन मागे पडले आहे. तपासात टॉलिवूडमधील अनेक स्टार्सच्या नियुक्तीमागेही डी कंपनीचा हात असून विशेषता डी कंपनीतील घरातील व्यक्तीही टॉलवूडमध्ये काम करून आपले नशीब आजमावत आहेत.

एनआयएच्या डी-कंपनीशी संबंधित कारवाईदरम्यान छोटा शकीलच्या कुटुंबातील एक अभिनेत्री सध्या टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. छोटा शकिलची आवडती हिरोईन मुमताजच्या नावाने ती टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ऐवढच नाही तर त्या अभिनेत्रीच्या बँक खात्यावर लाखो रुपयेही टप्याटप्याने जमा होत आहेत.

डी कंपनीचा व छोटा शकिलचा सर्वात जवळचा हस्तक आरिफ शेख उर्फ ​​आरिफ भाईजान हा सध्या अटकेत आहे. आरिफ भाईजानच्या दुसऱ्या पत्नीची सावत्र मुलीने टॉलिवूडमधून अभिनेत्री म्हणून कारकिर्द सुरू केली आहे. २२ मे २०२२ रोजी तिच्या खात्यातून पहिल्यांदा चार लाख दुसऱ्यांना ६ लाख असे १० लाखाचे व्यवहार झाल्याचे NIA च्या निदर्शनास आले आहे.

आरिफ भाईजानच्या दुसऱ्या पत्नीने NIA ला चौकशीत 2021 मध्ये तिने गोरेगावमध्ये साडेतीन कोटींमध्ये थ्री-बीएचके अपार्टमेंट खरेदी केले होते. ज्यासाठी जागेसाठी तिने गुंतवणूकदाराला 70 लाख रुपये दिले. दरम्यान इन्वेस्टरने पुन्हा ते पैसे परत केल्यानंतर यातील काही पैसे शकिलच्या सांगण्यावरून आरिफने शकिलची मुलगी झाराच्या नवऱ्याच्या खात्यावर वळवले. तर ६ लाख रुपये शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवले तसेच ६ लाख व ४ लाख स्वत: सावत्र मुलीच्या खात्यावर वळते केले.

NIA आणि इतर तपास यंत्रणा आता चांगल्याच सतर्क झाल्या असून बॉलिवूड पाठोपाठ टॉलिवूडमध्ये डी कंपनी कशा प्रकारे पैशांची अफरातफर करते याची माहिती आता तपास यंत्रणा गोळा करत आहेत. दरम्यान NIAच्या तपासात आणखी एका टीव्ही-अभिनेत्याचे नाव समोर आले आहे. या अभिनेत्याने महाभारत मालिकेतील महत्त्वाची भूमिका केली असून बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

NIAने या अभिनेत्याचा जबाबही नोंदवला आहे. चौकशीदरम्यान, तो छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूटशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. सलीम फ्रूटच्या अनेक वैद्यकीय दुकानांचे उद्घाटन करण्याबरोबरच, 36 लाख रुपयांच्या वसुलीतही त्याचा सहभाग होता. त्यामुळेच आता NIA च्या रडारवर बॉलिवूडसोबत आता टॉलिवूडही असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT