Three children injured after a speeding car hit them while returning from fetching water in Titwala, highlighting the ongoing water crisis. saam tv
मुंबई/पुणे

टिटवाळ्यात पाणीटंचाईचा कहर! पाणी आणायला गेलेल्या 3 चिमुकल्यांना भरधाव कारची धडक

Titwala Water Crisis Accident Three Children Injured: टिटवाळ्यातील पाणीटंचाईमुळे भीषण अपघात; पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या तीन चिमुकल्यांना भरधाव कारची धडक. तिन्ही मुले जखमी असून उपचार सुरू, चालकाविरोधात गुन्हा दाखल.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण लगतच्या टिटवाळा ग्रामीण भागातील पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. पिण्याचे पाणी भरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन अल्पवयीन मुलांना भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात झाल्यानंतरच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायला झालाय या प्रकरणात टिटवाला पोलिसांनी चालक अमन सानप विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केलाय

हा अपघात शनिवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास टिटवाळा पूर्व येथील इंदिरा नगर ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला तीन अल्पवयीन मुलं गॅलनमध्ये पिण्याचे पाणी भरण्यासाठी एका ठिकाणी गेले होते मात्र त्या ठिकाण त्यांना पाणी मिळाले नाही हे तिघं मुलं घरी परतत असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गाळ्यात घुसली. या अपघातात गाळ्याचे तसेच तेथे उभ्या असलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी मुलांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी चालक अमन सानप विरोधात गुन्हा दाखल करीत गुरुजी तपास सुरू केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोन्याच्या भावात अचानक मोठी उलथापालथ! आठवड्यात सोनं तब्बल ₹३,४४० ने स्वस्त; पाहा १८, २२ अन् २४ कॅरेटचे नवे दर?

Maharashtra News Live Update: कृष्णराज महाडिक नेमके काँग्रेसचे की भाजपचे?

Supreme Court : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह ८ राज्यातील उच्च न्यायालयांना नवे मुख्य न्यायाधीश; पाहा कोणाची कुठे नियुक्ती

Best Teas For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 5 चहा ठरतील फायदेशीर; जाणून घ्या कोणते आहेत?

Ukadiche Modak Recipe : उकडीचे मोदक फाटतात? 'ही' ट्रिक वापरा, प्रत्येक मोदक बनेल परफेक्ट

SCROLL FOR NEXT